२००९०५१०

ऊर्जा

ऊर्जा

बटण दाबता पंखे फिरती । दिवे लागती, ट्युब उजळती ॥
ऊर्जा त्यांना मिळते कैसी । आले का कधी तुम्हा मानसी ? ॥ १ ॥

तारांतुनी ते वीज मिळविती । क्षणी पेटती, क्षणात विझती ॥
तारा तरी ती कुठुनी आणती । ऊर्जा त्यांच्यासाठी इतुकी ? ॥ २ ॥

तारा, ऊर्जा-संयंत्रातुनी । तिला आपल्या घरी आणती ॥
संयंत्रात, तरी ती कोठुनी । येई ऊर्जा, की जादूतुनी ? ॥ ३ ॥

जळते इंधन संयंत्रांतुनी । ऊर्जा त्याची तिथे बदलुनी ॥
तिचे रुपांतर विजेत घडुनी । वीज होऊनी, ती ये तिथुनी ॥ ४ ॥

वाटे ऊर्जा मिळते सहजी । नसे जगी या, तसे कधीही ॥
कुठे कष्टल्या विना कुणीतरी । कुणा कधी का, सुखे लाभती ? ॥ ५ ॥

नरेंद्र गोळे २००३१०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: