ऊर्जा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ऊर्जा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१००७०७

ऊर्जा (हिंदी)

बटन दबाये दिया जले ।
पंखा घुमे, ट्यूब लगे ॥
सोचा है क्या कभी आपने ।
कैसे बिजली इन्हे मिले ॥ १ ॥

दूर कहीं जनित्रों में बनकर ।
बिजली आती है तारोंपर ॥
अविरत ऊर्जा प्रसवत है ।
ये जनित्रों में क्या जादू है ॥ २ ॥

जनित्रों में जलता है ईंधन ।
बिजली में ढलता है प्रतिपल ॥
वह बिजली तारोंपर आकर ।
रोशन करती अपना घर घर ॥ ३ ॥

इससे जाहीर होता इक ।
कुदरत का करिष्मा मौलिक ॥
कहीं किसी के बिना कष्ट के ।
कहीं किसी को मिलता है सुख? ॥ ४ ॥

- नरेंद्र गोले २०१००७०७

२००९०५१०

ऊर्जा

ऊर्जा

बटण दाबता पंखे फिरती । दिवे लागती, ट्युब उजळती ॥
ऊर्जा त्यांना मिळते कैसी । आले का कधी तुम्हा मानसी ? ॥ १ ॥

तारांतुनी ते वीज मिळविती । क्षणी पेटती, क्षणात विझती ॥
तारा तरी ती कुठुनी आणती । ऊर्जा त्यांच्यासाठी इतुकी ? ॥ २ ॥

तारा, ऊर्जा-संयंत्रातुनी । तिला आपल्या घरी आणती ॥
संयंत्रात, तरी ती कोठुनी । येई ऊर्जा, की जादूतुनी ? ॥ ३ ॥

जळते इंधन संयंत्रांतुनी । ऊर्जा त्याची तिथे बदलुनी ॥
तिचे रुपांतर विजेत घडुनी । वीज होऊनी, ती ये तिथुनी ॥ ४ ॥

वाटे ऊर्जा मिळते सहजी । नसे जगी या, तसे कधीही ॥
कुठे कष्टल्या विना कुणीतरी । कुणा कधी का, सुखे लाभती ? ॥ ५ ॥

नरेंद्र गोळे २००३१०१५